Wednesday 5 October 2011

An excellent Art Work

Hello Friends,
This is to bring to your attention one of a master piece of artwork submitted by a member of our group, with the name Mr. Shrikant Sonar. This is a poem written about the varied sentiments which are embedded in the deep hearts of the trekkers from our group. Kindly Go through the poem once and I am sure I you would not stop reading it again and again till you almost know it by heart.
Enjoy the work of our member and don't forget to give your reviews about it, which I am sure would encourage him and others,
Regards,
Vishal Ghaywat

मी निघालोय असाच.. ऊठ सूट भटकंतीला.. पाऊलवाट शोधत..
अंगात सळसळणारं रक्त ... अन् एक प्रश्नचिन्ह सोबत..!!

मी दिशा विचारतो वाऱ्याला.. वर लखलखनाऱ्या पाऱ्याला..
रात्री चंद्र वाटाड्या .. मग प्रश्न नक्षत्र ताऱ्याला ..!!

इथे मीच वेडा.. मीच शहाणा.. इथे मी 'मी' आहे..
निसर्गाचा व्यास मोजणारा... मी आज जादुगार आहे..!!

वाटेत भेटलं तऴं .. तर पिऊन घेतो.. भेटलीच नदी तर पोहून घेतो..
पाऊसात भिजून घेतो... उन्हात रापून घेतो.. आज मी निसर्ग जगून घेतो..!!

रोज तिच तिच स्वप्न का पहायची .. ?
आज आगळी रात जागायची..
दूर - दूर जिथे भिडते नजर...
दृश्य ती जिवंत जगायची..!!

येथे डेरेदार वृक्ष साक्षीदार...
उत्तुंग खडक गडाचे पेहेरेदार...
धुक्याची शाल पांढरी ओढून अंगाभोवती ..
किल्ला उभा दिमाखात..!!

मी मार्ग शोधतो .. शिखर गाठतो.. करतो आनंद उन्माद..
किल्ल्यासमोर जोडून हात.. गगनात शिवगर्जनेचा नाद..!!

माझी ही एक शपथ .. एक हाक .. एक वज्रमुठ अतूट..
डोळ्यांत स्वप्न .. ओठांवर गाणं .. उठ - सूट.. उठ-सूट.. उठ-सूट..!!



----  Written By
-----Shrikant Sonar----